Yaadi Exchange Offer 2021 Terms & Conditions

These are the full terms and conditions of the Yaadi exchange offer

या एक्सचेंज ऑफर बाबतच्या नियम व अटी

  • हा प्रोग्राम 25 जून पासून 30 जुलै 2021 पर्यंत चालेल.
  • हि ऑफर फक्त शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहील.
    इतर दिवशी आल्यास हि ऑफर चालू असणार नाही तसेच भंगार स्वीकारले जाणार नाही.
  • आपणास दिली गेलेली कुपन फक्त याच काळात चालू शकते.
  • आपल्याकडून रद्दी किंवा जे भंगार किंवा जी वस्तु घेतले आहे त्याच्या बदल्यात फक्त आणि फक्त आपणास कुपन मिळतील. त्या बदल्यात कोणत्याही प्रकारची कॅश, चेक किंवा क्रेडिट नोट किंवा इतर वस्तु अशी कोणतीही गोष्ट मिळणार नाही.
  • कपडे देताना चिंध्या किंवा तुकडे चालणार नाही कपडे सुस्थितीत असावा
  • रद्दी देताना ती सुस्थितीत असावी कागदाचे तुकडे चालणार नाहीत.
  • जाहिरात मध्ये दिलेले मालाचे रेट हे जास्तीत जास्त आहेत स्क्रॅप किंवा भंगार, किंवा वस्तु खरेदिवेळी प्रॉडक्ट / वस्तु ची कंडिशन बघून रेट जागेवर ठरवण्यात येतील. ते रेट वर माल विकण्याचा किंवा ते रेट नाकारण्याचा संपूर्ण अधिकार ग्राहकास असेल.
  • एकदा आपण दिलेली भंगार किंवा वस्तू कोणत्याही स्वरूपात पुन्हा रिटर्न मिळणार नाही.
  • कोणतीही वस्तू अथवा भंगार यास रिसेल व्हॅल्यू उपलब्ध असल्यास किंवा ती सुस्थितीत असल्यास तरच ती घेण्यात येईल अन्यथा ती नाकारण्यात येईल.
  • याबाबत कोणतीही वस्तू स्वीकारण्याचा व नाकारण्याचा पूर्ण अधिकार आमच्या प्रतिनिधी यांना राहील.
  • ग्राहकांनी वस्तू देते वेळी दिलेला फॉर्म व्यवस्थित भरून देणे आवश्यक आहे.
  • ग्राहकांनी दिलेल्या कूपन व्यवस्थित सांभाळून ठेवणे आवश्यक आहेत कोणत्याही प्रकारात फाटलेली कुपन खराब झालेले कुपन किंवा हरवलेले कुपन बदल्यात दुसरी नवीन कुपन मिळणार नाही अथवा कुपन ची फोटो कॉपी सुद्धा चालणार नाही.
  • दिलेले कूपन ची रक्कम पूर्ण वापरावी लागेल त्यातली कमी रक्कम चालणार नाही.
  • एक्सचेंज ऑफर सोबत दुसरी कोणतीही ऑफर आपणास घेता येणार नाही.
  • आपणास दिलेल्या कूपन च्या किमतीपेक्षा दहा पट जास्त रकमेची खरेदी करणे आपणास बंधनकारक राहील यात कोणताही बदल होणार नाही.          उदाहरणार्थ  : एखाद्या व्यक्तीने रद्दी विकली त्याबदल्यात त्यांना पाचशे रुपयांचे कूपन मिळाले तर त्यांना कमीत कमी पाच हजार रुपयांची खरेदी करावी लागेल, समजा एखाद्या व्यक्तीकडे रुपये पाचशे चे कुपन आहेत मात्र त्याचा फक्त एक हजार रुपये चा किराणा खरेदी झाला अशावेळी लोवेस्ट डीनॉमिनेशन म्हणजेच अर्थात फक्त शंभर रुपये चे कुपन स्वीकारले जातील आणि उरलेले कूपन पुन्हा ग्राहकाकडे परत दिले जातील स्कीम च्या दिलेल्या काळात ग्राहक पुन्हा खरेदी करू शकतो.
  • एक्सचेंज ऑफर तेल व साखर या वस्तूसाठी उपलब्ध नाहीत.
  • जर कुपन व्हॅल्यू आणि ऑफर पेक्षा जास्त रकमेचा किराणा खरेदी झाला तर वरील रक्कम आपल्याला कॅश किंवा ऑनलाइन स्वरूपात पेड करावी लागेल
  • वरील योजना कोणत्याही स्वरूपात कोणतीही पूर्वसूचना न देता बदलण्याचा व थांबवण्याचा किंवा दिलेल्या नियम व अटी मध्ये बदल करण्याचा हक्क कंपनी स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  • जर याबाबत कोणताही कायदेशीर वाद उद्भवल्यास फक्त अहमदनगर न्यायालय कक्षेत राहील.
  • या स्कीमचा फायदा घेण्यासाठी कस्टमरला सर्व नियम व अटी मान्य आहेत असे त्यांना डिक्लेअर करावे लागेल आणि त्यानंतरच स्कीमचा फायदा घ्यावा लागेल.
  • जर कोणत्याही स्वरूपात कुपन मध्ये बदल आढळल्यास किंवा त्यामध्ये कोणताही फेरफार केल्यास असे कूपन रद्द करण्याचा अधिकार कंपनी स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  • ही ऑफर न घेता सुद्धा सर्व प्रकारचे किराणा आपणास थेट मिळू शकतो

Main Menu